Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

📌 वणी परिसरात भंगार चोरट्यांचा सुळसुळाट

April 21, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,021

वणी टाईम्स न्युज | तालुक्यातील मौजा निवली परिसरात महावितरणाच्या 11 केव्ही वीज खांब चोरीचा प्रयत्न उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पती पत्नी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक अभियंता वैभव बंडुजी सिडाम (वणी ग्रामीण वीज वितरण केंद्र) यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, 17 एप्रिल 2026 रोजी रात्री अंदाजे 8.30 ते 9.00 वाजताच्या सुमारास निवली ते तरोडा मार्गावर सुंदरनगर येथील 11 केव्ही लाईनचे लोखंडी खांब जमिनीतून उपसून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.

माहितीवरून सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, काही चोरटे जमिनीत गाडलेले खांब उपसण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. अचानक कर्मचारी पोहोचल्याचे लक्षात येताच दोन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, एक महिला आणि एक पुरुष यांना घटनास्थळीच पकडण्यात यश आले.

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पकडलेल्या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्या जवळून एक दुचाकी आणि चोरीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी धनु राघो थोटे व सकुबाई धनु थोटे, रा. खरबडा मोहल्ला वणी विरुद्ध कलम 303(2) व 62 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत महावितरणाचे आर्थिक नुकसान झाले असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वणी परिसरात व ग्रामीण भागात भंगार चोरटे सक्रिय असून वीज कंपनीचे अल्मयुनियम तारा व लोखंडी खांब तसेच शेतातील मोटार केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे.

Tags: crime newsmsebshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

बापुराव आकीनवार यांचे निधन

Next Post

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
निधन

बापुराव आकीनवार यांचे निधन

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL