Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

» राळेगाव कनेक्शनची चर्चा, SIT तपासाची मागणी

April 23, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 726

वणी टाईम्स न्युज | मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मजूर कुटुंबातील 16 वर्षे 10 महिन्यांची मुलगी घरून शौचास जात असल्याचे सांगून बाहेर गेली. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने वडिलांनी शेजारी व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. तसेच आसपासच्या गावांमध्येही चौकशी केली, परंतु मुलगी आढळून आली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करत वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जबानी रिपोर्ट दाखल केला आहे.

दरम्यान, मारेगाव तालुक्यातून अनेक अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना समोर येत असल्याने हा प्रकार गंभीर बनला आहे. या घटनांचा राळेगाव येथे घडलेल्या तत्सम प्रकरणांशी काही संबंध आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे. राळेगावप्रमाणेच मारेगावमध्येही SIT मार्फत तपास केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व घटनांची दखल घेत कठोर कारवाई करावी, तसेच बेपत्ता मुलींचा शोध लावून त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: crime newsmaregao policeminor girl missing
TweetSendShareShare
Previous Post

दीप्ति टॉकीज में 24 अप्रैल से देखिए “डकैत” एक प्रेमकथा

Next Post

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026
निधन

बापुराव आकीनवार यांचे निधन

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL