Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

▪️बांधकाम परवानगी व इतर कामासाठी आर्थिक व्यवहार न करण्याचे फलक

April 24, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 245

जितेंद्र कोठारी, वणी |

शासकीय कामासाठी निर्धारित शुल्क व्यतिरिक्त लाच घेणे हा शिष्टाचारचा एक भाग झाला आहे. मात्र नगर परिषद वणी येथील नियोजन समिती सभापती लक्ष्मण उरकुडे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर लावलेल्या सूचना फलकामुळे पारदर्शक प्रशासनाचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. या फलकाद्वारे नागरिकांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे की, नियोजन विभागांतर्गत कोणत्याही बांधकाम परवानगीसह इतर कामांसाठी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत.

या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, वणी नगर परिषद कार्यालयात सर्व कामे शासकीय नियमांनुसार आणि निश्चित शुल्कानुसारच केली जातात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने अतिरिक्त पैसे मागितल्यास नागरिकांनी तत्काळ नियोजन सभापती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियोजन सभापती यांच्या ह्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत असून, दलालांच्या हस्तक्षेपाला आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असले तरीही नगर परिषद मधील इतर विभागांमध्ये ही असेच फलक लावण्यात येणार का ?

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “अशा स्पष्ट सूचनांमुळे फसवणूक टाळता येईल आणि कामे अधिक सुलभ होतील,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकंदरीत, वणी नगर परिषदेकडून नागरिकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासनाची दिशा दाखवणारा हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

Tags: Lead storynagar parishad
TweetSendShareShare
Previous Post

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

Related Posts

वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026
निधन

बापुराव आकीनवार यांचे निधन

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL