Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

📌 चोपन येथील शेतकऱ्याचे 1.64 लाखांचे नुकसान

April 20, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 81

वणी टाईम्स न्युज | मारेगाव तालुक्यातील चोपन शेतशिवारात जुन्या वैमनस्यातून शेतातील कोठ्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 326(f) आणि भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पंकज सुरेश खिरटकर (33) रा. चोपन, ता. मारेगाव यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गावालगत त्यांचा शेत आहे. दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते घराच्या छतावर असताना शेताच्या दिशेने धूर निघताना दिसला. त्यांनी तत्काळ शेताकडे धाव घेतली असता शेतीसाठी लागणारे विविध अवजारे व साहित्य ठेवलेल्या कोठ्याला आग लागलेली दिसली.

फिर्यादी कोठ्याजवळ गेला असता त्यावेळी शेजारील शेतातील उदय भाऊराव खिरटकर (वय 37) व प्रविण भाऊराव खिरटकर (वय 35) हे घटनास्थळावरून पळून जाताना दिसून पडले. यानंतर फिर्यादीने वडील, चुलत काका आणि मित्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत लाकडी अवजारे, स्प्रे पंप, स्प्रिंकलर सेट, खताच्या पिशव्या, ताडपत्री, चाकांची जोडी, वीज तारा, तसेच कोठ्याचे बांधकाम साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

या घटनेत सुमारे 1 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादातून शेजारील शेतमालक उदय भाऊराव खिरटकर व प्रविण भाऊराव खिरटकर यांनी जाणूनबुजून आग लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ASI दिगंबर किनाके करीत आहेत.

Tags: crime newsmaregaon
TweetSendShareShare
Previous Post

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

Related Posts

क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026
क्राईम

विवाहिता को प्रताड़ना : दो मामलों ने ससुराल पक्ष के 9 लोगों के खिलाफ मामला दर्ज

April 16, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL