वणी टाईम्स न्युज: वणी महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उल्हास निमेकर यांची निवासी नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाली आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक कार्यशैली आणि जनतेशी सलोख्याचे संबंध ही त्यांची ओळख असून, त्यांनी आपल्या सेवाकाळात महसूल विभागातील विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत.
उल्हास निमेकर हे अत्यंत साधे, मनमिळाऊ आणि कामात काटेकोर अधिकारी म्हणून परिचित आहेत. शासकीय कामकाजात पारदर्शकता राखत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
निवासी नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासनातील कौशल्याचा महसूल विभागाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनेल, अशी अपेक्षा नागरिक तसेच सहकारी अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.










