• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रोटरी महोत्सव 2026 : वणीत व्यापार, मनोरंजन व सेवाभावाचा भव्य संगम

🎊 बाजार समिती प्रांगणात भूमिपूजन सोहळा संपन्न

Wani Times by Wani Times
January 7, 2026
in मनोरंजन, रोजगार, वणी, व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,068

जितेंद्र कोठारी, वणी :  रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रोटरी महोत्सव 2026’ च्या भव्य आयोजनाचा शुभारंभ आज भूमिपूजनाने उत्साहात झाला. हा बहुप्रतिक्षित महोत्सव दि. 21 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी येथे आयोजित करण्यात येणार असून, सहा दिवस चालणारा हा उपक्रम वणी शहर व परिसराच्या व्यापारी, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

व्यावसायिकदृष्ट्या पाहता, रोटरी महोत्सव हा स्थानिक व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच बाहेरील विक्रेत्यांसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. महोत्सवात जनरल स्टॉल, प्रीमियम स्टॉल आणि विविध विषयांवरील स्टॉल्स उभारण्यात येणार असून, यात कपडे, गृहउपयोगी साहित्य, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन गरजेच्या वस्तू, भेटवस्तू, हस्तकला व इतर अनेक उत्पादने उपलब्ध राहणार आहेत. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची उपस्थिती मिळाल्याने विक्री व व्यवसायवाढीसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य फूड झोन. स्थानिक तसेच बाहेरील नामांकित खाद्य विक्रेत्यांसाठी येथे व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार असून, चाट पदार्थ, पाणीपुरी, भेळ, डोसा, पंजाबी व चायनीज खाद्यपदार्थ, मिठाई, आईस्क्रीम आदी विविध खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे. यामुळे खाद्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. तसेच अमेझॉन पार्क हे मनोरंजन क्षेत्र सर्व वयोगटांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध झुले, राईड्स आणि खेळण्यांमुळे कुटुंबांसह येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी राहण्याची अपेक्षा असून, याचा थेट सकारात्मक परिणाम महोत्सवातील एकूण व्यवसायावर होणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल, सचिव गौरव जोबनपुत्रा, रोटरी महोत्सव अध्यक्ष अश्विन कुमार कोंडावर यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना, रोटरी महोत्सव हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा उपक्रम असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वणी शहरात व्यापार, रोजगाराच्या संधी, ग्राहकांची खरेदीशक्ती आणि सामाजिक सहभाग वाढवणारा रोटरी महोत्सव 2026 हा एक महत्त्वाचा आर्थिक व सामाजिक उपक्रम ठरणार असून, नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Lead storyRotary clubRotary fairwani
TweetSendShareShare
Previous Post

उल्हास निमेकर यांची निवासी नायब तहसीलदारपदी बढती

Next Post

विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL