Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

📌 मारेगाव येथील सेंट्रल बँकेत महिला चोरट्यांनी बॅगला चिरा मारून 50 हजार लांबविले

April 25, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 461

वणी टाईम्स न्युज : तुम्ही रोख रक्कम विथड्रॉल करायला बँकेत जात आहे तर, सावध व्हा..! बँकेच्या गर्दीत तुमच्या आजूबाजूने किंवा मागे कुणीतरी फिरत आहे का ? ती लहान मुलगा, मुलगी किंवा महिलाही असू शकते. गर्दीत तुमचं लक्ष चुकवून ती तुमच्या रक्कमेवर हात साफ करु शकते. अशीच एक घटना मारेगाव येथे नुकतीच उघडकीस झाली आहे. जिथे दोन महिलांनी बँकेतून काढलेली रक्कम ठेवलेल्या बॅगेच्या आतील बाजूस चिरा मारून 50 हजाराची रक्कम लांबवली.

फिर्यादी राहुल किसन भरडे (३६) रा. डोमा ता. चिमुर जि. चंद्रपूर हे वीज वितरण सबस्टेशन खापरी येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. दि. १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता, भरडे आणि त्यांचे साथीदार पीयूष वैद्य हे मारेगाव येथील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी प्रथम ५० हजार रुपये काढून बॅगेत ठेवले. त्यानंतर पॅन कार्ड लिंक करण्यासाठी दोघे बँकेबाहेरील झेरॉक्स दुकानात गेले

दरम्यान, बँकेत पुन्हा परत आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरडे यांच्या बॅगेस आतून चिरा मारून ५० हजार रुपये लंपास केले. बॅग तपासल्यावर ही चोरी उघडकीस आली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन संशयित महिला भरडे यांच्या मागे फिरताना दिसून आल्या. त्याच महिलांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

घटनेनंतर फिर्यादी तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकले नाहीत. मात्र, नंतर त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात महिला आरोपी विरुद्ध कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करुन संशयित महिलांचा शोध सुरू केला

टिप: बातमीच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी AI इमेजचा वापर करण्यात आला आहे.

Tags: crimemaregao policetheft
TweetSendShareShare
Previous Post

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

Next Post

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL