वणी टाईम्स न्युज: जय बजरंग शिक्षण संस्था मुकुटबन व पोलीस स्टेशन मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे गुरुवार 31 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा परिसरात ‘सदभावना उद्यान’ नावाने एक बगीचा तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांना झाड दत्तक देऊन त्यांना संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली.

या कार्यक्रमाला मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास कुलकर्णी तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याधपिका ममता जोगी, मुख्याध्यापक सुरेश परचाके, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर वैध, जुनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका प्रविणा काकरवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









