Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home वणी

रेती तस्करीचा फंडा; ट्रक एकाचा, रेती दुसऱ्याची आणि विकणारा तिसराच

★ एकच वाहन दोनदा किंवा अधिक वेळा अवैधरीत्या रेती वाहतूक करताना आढळल्यास वाहन ताब्यात घेण्याचा शासन निर्णय

July 27, 2025
in वणी, संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,253

वणी टाईम्स न्युज : तालुक्यात सद्य रेती तस्करीला ऊत आले असून काही राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेही पडद्याआड रेती तस्करीत गुंतल्याचे बोलले जाते. त्यासाठी त्यांनी वेगळा फंडा अमलात आणला आहे. रेती घाटावरून रेतीची वाहतूक करणारा ट्रकचा मालक एक, रेती तस्करी करणारा तस्कर दुसरा आणि प्रत्यक्ष ग्राहकांना रेती विक्री करून पैसा घेणारा माणूस तिसराच.! विशेष म्हणजे एखाद्या वेळी महसूल किंवा पोलिस विभागाने गाडी पकडल्यास गुन्हेगार म्हणजे वाहनाचा चालक. या सगळ्या चक्रव्युहात गुन्हा दाखल होतो चालकावर आणि दंड भरावं लागतं ट्रक मालकाला. खरा गुन्हेगार रेती तस्कर पडद्यामागेच राहतो.

शुक्रवार 25 जुलै रोजी रात्री 10.40 वाजता शहरातील रवीनगर भागात पकडलेल्या वाहनाची कथा काही अशीच असल्याची माहिती हाती आली आहे. माहितीनुसार अवैधरीत्या विना परवाना रेतीची वाहतूक करणारा टाटा हायवा क्रमांक MH34 BG1596 हा चिन्ना टोपण नाव असलेल्या एका व्यक्तीचा आहे. त्यामध्ये जी रेती भरलेली होती ती रेतीच्या धंद्यात नव्याने उतरलेल्या एका व्यक्तीची तर सेल्स मॅनेजर म्हणून पटेल नावाचा व्यक्ती ट्रक सोबतच एका चारचाकी वाहनात पेट्रोलिंग करत होता.

वणीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी स्वतः ही गाडी पकडल्यामुळे रेती तस्कराचा नेहमी प्रमाणे “सेटिंग” व दबावतंत्रचा प्रयोग फसला. सदर वाहनाला रात्रीच पोलीस स्टेशनला आणून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH34 BG 1596 हा यापूर्वी एकदा रेती तस्करी करताना आढळला होता. त्यावेळी दंड वसूल करुन वाहन सोडण्यात आले. मात्र आता तोच वाहन दुसऱ्यांदा विना परवाना रेती वाहतूक करताना आढळला. त्यामुळे बाँड ऑफ अंडरटेकिंगचा भंग केल्या प्रकरणी वाहनावर तिप्पट दंड किंवा वाहन शासन जमा करण्याचा कायदा लागू होतो.

रेतीचे अवैध उत्खनन व तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. रेतीच्या वाहनावर दंड आकारणी शिवाय वाहन मालक व रेती तस्करावर गुन्हे दाखल केल्यास त्यांना धाक बसणार. तसेच रेती वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला GPS सिस्टिम आहे की नाही, आणि आहे तर त्याची लोकेशन ट्रेस करणे गरजेचे आहे. शुक्रवारी जप्त केलेले ट्रकचे मालक व रेती मालकाचा शोध लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यास तस्करी रोखण्यास मदत होईल असे नागरिकांचे मत आहे.

Tags: Editorialpolice departmentrevenue departmentsand smuggling
TweetSendShareShare
Previous Post

अवैधरित्या रेती वाहतूक; 7 ब्रास रेतीसह हायवा ट्रक ताब्यात

Next Post

राजस्थानी महिला मंडल द्वारा नि:शुल्क आई कैम्प का आयोजन

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL