वणी टाईम्स न्युज : राज्यातील 65 उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश आज गृह विभागाने काढले असून वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी (SDPO) गणेश रामचंद्र किंद्रे यांची बदली पोलीस उप अधीक्षक (फोर्स 1) मुंबई येथे झाली आहे. त्यांच्या जागेवर हिंगोली ग्रामीण येथील उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांना वणी येथे पाठविण्यात आले आहे.

2012-13 बॅचचे अधिकारी गणेश किंद्रे यांनी 25 मे 2023 रोजी वणी उप विभागाचे SDPO म्हणून पदभार सांभाळले होते. आपल्या 26 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पेंडिंग गुन्ह्यची चौकशी करून आरोपींना कारागृहात पाठविले. आता नवीन अधिकारी सुरेश दळवे यांचे समोर उप विभागातील 5 पोलिस ठाण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान आहे.









