Sunday, April 19, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home वणी

चिखलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

📍सरपंच, उपसरपंच व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

April 9, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,047

वणी टाईम्स न्युज | यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार, शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि विविध अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थ मनोज सुधाकर नवले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने शासकीय नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही गंभीर मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:

• शासनाने जप्त केलेल्या रेतीची बेकायदेशीर विल्हेवाट लावून न्यायालयात खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप

• प्रत्यक्षात खरेदी न केलेल्या सुमारे ४०० ब्रास रेतीची खोटी नोंद दाखवून लाखो रुपयांचा अपहार

• मनरेगा (MGNREGA) अंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे व निधीचा गैरवापर

• गावातील काँक्रीट रस्त्यांमध्ये दर्जाहीन काम; भेगा बुजवण्यासाठी चुकीच्या तांत्रिक उपायांचा वापर

• शासकीय जागांवर अतिक्रमण व त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तसेच, अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले असून २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता. मात्र, त्या ठरावावर सरपंचांनी सही करण्यास नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रशासनात बिघाड

ग्रामपंचायतीतील मनमानी कारभारामुळे तब्बल आठ सदस्यांनी राजीनामा दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रशासनातील गंभीर बिघाड अधोरेखित झाला आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

तक्रारदाराने या प्रकरणातील सर्व बाबी भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे सांगत पुढील मागण्या केल्या आहेत:

• संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करणे

• संबंधित सरपंच, उपसरपंच व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे

• अपहार झालेल्या निधीची संबंधित व्यक्तीकडून वसुली

• दोषींना निलंबित किंवा बडतर्फ करणे

ही तक्रार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्रात नोंदविण्यात आली असून, आता राज्य सरकारकडून या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: ग्रामपंचायतचिखलगावभ्रष्टाचारमुख्यमंत्री
TweetSendShareShare
Previous Post

मारेगावात विवाहितेवर अत्याचार; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ठगी : सरकारी नौकरी का झांसा देकर लगाया साढ़े सात लाख का चुना

Related Posts

क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026
क्राईम

विवाहिता को प्रताड़ना : दो मामलों ने ससुराल पक्ष के 9 लोगों के खिलाफ मामला दर्ज

April 16, 2026
क्राईम

मानसिक रूप से कमजोर नाबालिग से दरिंदगी, आरोपी गिरफ्तार

April 15, 2026
ब्रेकिंग न्युज

वणी वरोरा मार्ग पर भीषण सड़क हादसा : 2 की मौत, 2 गंभीर जख्मी

April 15, 2026
क्राईम

गौ हत्यारों के घरों पर बुलडोजर चलाने की मांग

April 15, 2026
ब्रेकिंग न्युज

जिनिंग फॅक्टरीत आग; लाखोंचा कापूस जळून खाक

April 13, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL