Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

अबब.. नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवकाच्या 29 जागासाठी तब्बल 195 अर्ज दाखल

🗳️ भाजप, शिवसेना (शिंदे), महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांनी भरले अर्ज

November 17, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,599

वणी टाईम्स न्युज : नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी सोमवारी वणी  येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गर्दी उसळली. सोमवारी तब्बल 101 अर्ज दाखल झाले. त्यात नगरसेवक पदासाठी 96 तर नगराध्यक्ष पदासाठी 5 अर्ज स्वीकारण्यात आले. यासोबतच वणी नगर परिषद नगराध्यक्ष पदाकरीता एकूण 9 अर्ज तर नगरसेवकाच्या 29 जगासाठी तब्बल 195 अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षसह 30 उमेदवारांनी रविवार 16 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यालयात अर्ज सादर केले. पक्षातर्फे सोमवारी सर्व उमेदवारांना अधिकृत एबी फार्म देण्यात आले असून उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात दाखल अर्जासोबत एबी फार्म जोडले. यासोबतच शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळण्यात अपयशी ठरलेल्या काही इच्छुकांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन भरले. तर पक्षाकडून तिकीट नाकारलेले काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकीट मिळविले. नामांकन परत घेण्याचे शेवटचे दिवस 26 नोव्हेंबर नंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणारआहे हे स्पष्ट होईल.

Tags: bjpelection nominationnagar parishad electionShivsena shindeshivsena UBT
TweetSendShareShare
Previous Post

दुःखद : जय बजरंग शिक्षण संस्थेचे मानद सचिव गणेश उदकवार यांचे निधन

Next Post

वणी नगर परिषद निवडणूक प्रचाराला भाजपची धमाकेदार सुरुवात

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL