Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

खदखद : आम्ही फक्त सतरंज्या उचलायला का ? संतप्त कार्यकर्त्याचा सवाल 

📌 आयातीत उमेदवाराला तिकीट देण्यावरून शिवसेना (उबाठा) कार्यकर्ताचा आमदार व जिल्हा प्रमुखाना सोशल मीडियावर सवाल

November 18, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,619

वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यावरून राजकीय पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या एका अज्ञात कार्यकर्ताने आमदार संजय देरकर व जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांना संबोधून सोशल मीडियावर एक खुला पत्र लिहून आपली नाराजी उघडपणे मांडली आहे.

शिवसेनेच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल या पत्रात त्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, हाडाच्या कार्यकर्तांना डावलून प्रभाग क्रमांक 14 मध्ये आयातीत उमेदवाराला उमेदवारी देणे हे न पटण्यासारखे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून आमदार साहेबांना निवडून आणले. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊन वेळप्रसंगी स्वतःवर पोलिस ठाण्यात गुन्हा ओढून घेतले. मात्र नगर परिषद निवडणूकीत जेव्हा कार्यकर्त्याला संधी देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र आयातीत उमेदवाराला प्राधान्य दिल्या गेला.

संतप्त कार्यकर्त्यांनी पुढे आपली नाराजी मांडतांना सवाल उपस्थित केला की, “आम्ही कार्यकर्त्यांनी फक्त पक्षासाठी सतरंज्या उचलायला का ?” सच्चे कार्यकर्त्यांची ही खदखद कधीही भूकंप म्हणून बाहेर पडू शकते, असा इशाराही या खुल्या पत्रात देण्यात आला आहे. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना आपण उचित संधी द्यावी अशी विनंती पत्रात शेवटी करण्यात आली आहे.

Tags: nagar parishad electionpolitical newsshivsena UBT
TweetSendShareShare
Previous Post

वणी नगर परिषद निवडणूक प्रचाराला भाजपची धमाकेदार सुरुवात

Next Post

बघा.. छाननीअंती निवडणूक लढण्यास किती उमेदवार ठरले पात्र

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL