वणी टाईम्स न्युज: भारतीय स्टेट बँक येथून सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गणपत मुके {66}, रा. रविनगर, वणी यांचे मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. सोमवारी रात्री 10 वाजता सुमारास त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना लगेच सुगम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी पहाटे त्यांचा ब्लड प्रेशर कमी होऊन त्याचे निधन झाले.
मुकुटबन येथील मूळ निवासी मधुकर मुके यांची स्टेट बँकेच्या वणी शाखेत बदली झाल्यानंतर ते रवीनगर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी तसेच आप्त कुटुंबीय आहे. स्व. मधुकर मुके यांचे बुधवारी सकाळी 10 वाजता वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.










