वणी टाईम्स न्युज : ‘क्रेडाई’ वणी (बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशन) ची सर्वसाधारण सभा दि. १० फेब्रुवारी २०१६ रोजी सुविधा लॉन, वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलीं. नवीन कार्यकारिणीनुसार संस्थेच्या अध्यक्षपदी संजय निमकर, उपाध्यक्षपदी निकेत गुप्ता, सचिवपदी मनीष चौधरी तर कोषाध्यक्षपदी श्रीकांत गारघाटे यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी किरण दिकुंडवार होते, तर मार्गदर्शक म्हणून रमेश सुंकुरवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सभेमध्ये बांधकाम क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी, नियमावलीतील बदल तसेच विकासात्मक नियोजनावर सदस्यांनी मते व्यक्त केली. त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी व सदस्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
क्रेडाई वणीचे सामाजिक व विकासात्मक उपक्रम
सभेदरम्यान संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. त्यामध्ये –
• मोक्षधाम वणी येथे शेडचे बांधकाम
• शहरातील विविध भागात वृक्षारोपण मोहीम
• बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
• बांधकाम व अभिन्यास संबंधित समस्या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा
• रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत जनजागृती
• बिल्डर्स व डेव्हलपर्ससाठी मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन
• विविध सामाजिक कार्यांना सहकार्य
या उपक्रमांमुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.
सभेला क्रेडाई वणीचे सभासद राजेश झीलपिलवार, संजय कोडगीरवार, विवेक पांडे, पुरुषोत्तम आवारी, विवेक ताटेवार, मनीष कोंडावार, संजय पोटदुखे, देवराव भगत, शैलेश तोटेवार, दामोधर देठे, निलेश कटारिया, अनिल उत्तरवार, आचल जोबनपुत्रा, निखील केडिया, प्रकाश कावडे, अनुज मुकेवार, आशिष काळे, रामभाऊ पोदुतवार, विनोद खुराणा, आशिष थेरे, अजिंक्य मत्ते, केतन गुंडावार, राहुल सुंकुरवार, जमीर खान, अरुण झाडे, हितेन अटारा व संदीप जयस्वाल आदी सदस्य उपस्थित होते.
सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.










