वणी टाईम्स न्युज : शहरात ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गस्ती दरम्यान LCB पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे शहरातील दामले फेल परिसरात छापा टाकून तब्बल 32 हजार रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे स्था. गुन्हे शाखा पथकाने दामले फेल परिसरात देशप्रेमी पानठेल्याजवळील कोपऱ्यात कारवाई केली. या कारवाईत खाकी रंगाचे 6 बॉक्स तसेच निळ्या चुंगळीत भरलेल्या 90 मिली क्षमतेच्या 200 शिश्या असा एकूण 800 बॉटल ‘डेक्कन रुपेश संत्रा’ देशी दारू हस्तगत करण्यात आला. प्रत्येकी बाटली किंमत 40 रुपये प्रमाणे हा साठा 32 हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपी शिवराज सुरेश रायपुरे (33), रा. दामले फेल, वणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था. गुन्हा शाखा), API दत्ता पेंडकर, PSI धनराज हाके, हेडकॉन्स्टेबल सुनील खंडागळे, हेडकॉन्स्टेबल सुधीर पांडे, NPC सुधीर पिदुरकर, NPC निलेश निमकर, PC रजनीकांत मडावी, DNPC सतीश फुके सर्व स्था. गुन्हा शाखा पथक यवतमाळ यांनी पार पाडली.










