Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home अपघात

ब्रेकिंग न्यूज : वीज कोसळून तरुण ठार, दोन जखमी

★ तेजापूर येथे शेतात बैल चारत असताना घडली दुर्देवी घटना

August 6, 2025
in अपघात, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 6,139

वणी टाईम्स न्युज : शेतात बैल चारत असताना अचानक आभाळ दाटून आलेल्या पावसादरम्यान आस्मानी वीज कोसळून एक तरुण ठार झाला तर 2 तरुण गंभीर जखमी झाले. वणी तालुक्यातील तेजापूर येथे बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता ही दुर्देवी घटना घडली. धम्मरत्न सुधाकर भगत (23) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा नाव आहे. तर गजानन दिवाकर कोंडेकर (24) व पूनम संजय मालेकर (23) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार तेजापूर येथील तिघ मित्र भगत यांचे शेतात बैल चारायला जाऊन होते. दुपारी 1.30 वाजता दरम्यान अचानक आभाळ दाटून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसातून बचाव करण्यासाठी तिघजणं शेतातील मांडवाखाली जाऊन बसले होते. दरम्यान मांडवावर आस्मानी वीज कोसळली. त्यात धम्मरत्न भगत हा जागीच ठार झाला. तर विजेच्या धक्क्याने गजानन कोंडेकर व पूनम मालेकर हे दोघं जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना वणी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी धम्मरत्न याला मृत घोषित केले.तर जखमी झालेले दोन्ही तरुणांना एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मृतक धम्मरत्न हा आई वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील अर्धांगवायू (लकवा) आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या मागे आई वडील व 4 विवाहित बहीणी आहे. कुटुंबातील एकुलता कमावता व्यक्ती गेल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags: accidentsky lightningwani
TweetSendShareShare
Previous Post

चोरट्याने वकील साहेबाच्या मोबाईलवर मारला डल्ला

Next Post

भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला उडविले; दुचाकीस्वार जागीच ठार

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL