वणी टाईम्स न्युज: भरधाव चारचाकी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार इसमाचा जागीच मृत्यू झाला. वणी मारेगाव मार्गावर मिलन ढाबा समोर रात्री 7.30 वाजता दरम्यान हा अपघात घडला. मृतक हा राजूर (कॉलरी) येथील रहिवासी तसेच त्याचा उपनाम बौध्दा असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक व वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रत्यक्षदर्शीयांच्या म्हणण्यानुसार यवतमाळ परिवहन विभागात नोंदणीकृत एका लाल रंगाच्या कार ने दुचाकीला धडक दिली.
अधिक माहिती येताच बातमी अपडेट करण्यात येईल.










