Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

महसूल अधिकारी निवडणुकीत बिझी, रेती तस्करांनी लुटलं बोरगाव (अ.) घाट

📌 तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा संगनमताने शेकडो ब्रास रेतीचा उपसा

December 10, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 786

वणी टाईम्स न्युज : एकीकडे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक शांततेत पार पडावी, त्यासाठी रात्रंदिवस काम करीत होते. तर दुसरीकडे मात्र महसूल विभागाचेच काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती तस्करांनी तालुक्यातील बोरगाव रेती घाटातून अवैधरित्या शेकडो ब्रास रेती चोरुन नेल्याचे वास्तव समोर आले आहे.

बोरगाव येथील एका शेतकऱ्याचा शेतातून बळजबरीने रेती घाटापर्यंत रस्ता तयार करुन चोरटी वाहतूक सुरु असताना शेतकऱ्याने महसूल अधिकाऱ्यांना तक्रार केली. त्यानंतर सोमवारी बोरगाव येथील तलाठ्यांनी जेसीबी मशिनीच्या सहाय्याने रेती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्या खोदून रस्ता बंद केला. तक्रारीनुसार तस्करांनी हाफ टन ट्रक व ट्रॅक्टर द्वारे तब्बल 100 ते 150 ब्रास रेतीचा उपसा बोरगाव घाटातून केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी निवडणूक कामात व्यस्त होते. नेमकी हीच संधी साधून रेती चोरट्यांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्याना हाताशी धरुन शेकडो ब्रास रेतीवर डल्ला मारला. शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून दररोज 10 ते 20 हायवा ट्रक अवैधरित्या विना रॉयल्टी शहरात रेती घेऊन प्रवेश करत आहे.

लिलाव थांबले… पण शहरात रेतीचे ट्रक धडधड !
वणी तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव अद्याप शासनस्तरावर रखडलेला असताना शहरात मात्र रेतीचा अक्षरशः महापूर उसळला आहे. शहरातील बांधकाम स्थळांवर जागोजागी रेतीचे प्रचंड ढिगारे, मुख्य रस्त्यावर उघड्यावर टाकलेली रेती आणि दिवसाढवळ्या धडधडत येणारे ट्रक… या सगळ्याने रेती माफियांचे जाळे किती भक्कम आहे याचा ठसा उमटतो आहे. लिलाव नाही, परवानगी नाही… मग एवढी रेती नेमकी येते कुठून ? महसूल खाते आणि पोलिस विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? प्रशासन व रेती माफियांमध्ये ‘म्युचुअल अंडरस्टँडिंग’मुळेच हा व्यवसाय निर्भयपणे सुरू आहे का? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tags: Lead storyrevenue departmentsand smuggling
TweetSendShareShare
Previous Post

CRIME: महिलेच्या हातातून 4 लाख रुपयांची बॅग हिसकावून भामटे पसार

Next Post

कार में देशी शराब की तस्करी करते आरोपी को पुलिस ने दबोचा

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL