वणी टाईम्स न्युज: राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्ता उमेदवारीसाठी आपल्या पक्षाकडे दावा दाखल करताना दिसत आहे. मात्र प्रत्येक राजकीय पक्ष “विनिंग कॅन्डिडेट” च्या शोधात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाचा वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अनेकांची धडपड सुरु आहे.
झरीजामणी तालुक्यात पाटण-मुकुटबन व माथार्जुन – मार्की असे जिल्हा परिषदचे दोन गण आहे. माथार्जुन – मार्की सर्कलमध्ये आदिवासी व तेलगू भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. तर पाटण-मुकुटबन सर्कल हा कुणबी समाज बहुल गण आहे. पाटण-मुकुटबन जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण उमेदवार राखीव आहे. त्यामुळे या मतदार संघातून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कुणबी समाजातील युवा व धडाडीचे कार्यकर्ता सुनील ढाले (सर) यंदा निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. शांत स्वभावाचे, अभ्यासू, संयमी व सुशिक्षित नेतृत्व म्हणून सुनील ढाले हे सुपरिचित आहे.
भावी जिल्हा परिषद सदस्य सुनील ढाले यांचा मोठा जनसंपर्क व मित्र परिवार आहे. मतदार संघातील सर्व शिक्षकवर्ग सुनील ढाले यांचे पाठीशी आहे. कुणबी समाज बहुल मतदार संघात सुनील ढाले हे योग्य आणि विनिंग उमेदवार ठरणार आहे. राजकारणात समाजकारणाचा महत्त्वाचा सहभाग असते. त्यामुळे पक्षाने उमेदवारी जाहीर करताना ही बाब लक्षात घेतल्यास हमखास विजय मिळणार. अशी आशा सुनील ढाले यांनी वणी टाईम्स सोबत बोलताना व्यक्त केली.










