• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वाट्टेल ते…! वणी शहरात नेमकं चाललंय तरी काय?

📌 न कायद्याची अंमलबजावणी, न तक्रारींची दखल — प्रशासनाच्या आपमर्जीचा कहर

Wani Times by Wani Times
February 4, 2026
in वणी, संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,760

“राजा सुजाण तर प्रजा सुखी” ही म्हण आज वणी शहरात उपहासाचा विषय ठरत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या वणी शहरात सध्या कायदा अस्तित्वात आहे की नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण येथे जे घडते आहे, ते पाहता “अंधेर नगरी, चौपट राजा” हीच म्हण वास्तव दर्शवते.

शहरातील जवळपास सर्वच शासकीय विभागांत अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली, नियम-कायद्यांची पायमल्ली आणि “तुमचं जे करायचं ते करा” असा मग्रूर आविर्भाव—हेच आजचे प्रशासनाचे खरे स्वरूप बनले आहे.

शहरातील शासकीय विभागांची पोलखोल करणाऱ्या मालिकेचा पहिला भाग : नगर परिषद प्रशासनाचे कारनामे

अवैध बांधकामांचा सुकाळ — नगर परिषद मुकदर्शक का?

नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. प्रशासक राजवटीच्या काळात बांधकाम नियम धाब्यावर बसवून परवानग्या दिल्या गेल्या. इतकेच नव्हे तर अनेक इमारती व ले-आऊटमध्ये मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम सर्रास झाले.

ले-आऊटमधील सर्व्हिस रोड व ओपन स्पेस भूखंडधारकांनी विकून खाल्ल्या, मात्र त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई झाल्याचे दिसत नाही. नियम फक्त कागदावरच आहेत का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

अतिक्रमणांचा विळखा — शहर श्वास कोंडतोय

वणी शहरातील रस्ते व फूटपाथ आज अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले आहेत. नांदेपेरा मार्ग हा राज्यमार्ग असतानाही त्यालगतच्या सर्व्हिस रोडवर पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

• जत्रा मैदान पूर्णतः अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

• साई मंदिर ते टागोर चौकपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फळ-भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटलेली आहेत.

• शहराचे हृदयस्थळ असलेले टिळक चौक व गांधी चौक अतिक्रमणधारकांच्या ताब्यात गेले आहे.

• मुख्य बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर पक्के ओटे व पायऱ्या बांधून रस्ते अरुंद केले आहेत. परिणामी नागरिकांना पायी चालायलाही जागा उरलेली नाही.

पार्किंग कुठे आहे ? की हा प्रश्नच गैरसोयीचा!

तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने दररोज हजारो नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनांनी वणी शहरात येतात. स्थानिक नागरिकही खरेदीसाठी वाहने घेऊन बाहेर पडतात.

• मात्र शहरात एकही अधिकृत सार्वजनिक वाहनतळ नाही.

• मोठे दवाखाने, शोरूम, बँका यांना स्वतःचे पार्किंग नसतानाही बांधकाम परवानग्या कशा दिल्या गेल्या?

• या परवानग्यांची चौकशी नवीन नगराध्यक्ष करणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

संपूर्ण शहरच भाजीमंडी ?

• कोरोना काळात दिलेली तात्पुरती सवलत आज कायमस्वरूपी अराजकतेत बदलली आहे. चौकाचौकात सुरू झालेली भाजी विक्री आता संपूर्ण शहरभर पसरली आहे.

• साई मंदिर ते टागोर चौकदरम्यान रस्त्याच्या कडेला लागलेल्या भाजीमंडीमुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे.

• नगर परिषदेला जर फळ-भाजी विक्रेत्यांसाठी एक ठरावीक, नियोजित जागा उपलब्ध करून देता येत नसेल, तर शहर नियोजनाचा दावा तरी कसा करता येईल?

प्रश्न अनेक… उत्तरं कुठे?

वणी शहर आज नियमशून्यतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रशासनाची जबाबदारी, नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे अस्तित्व—या सगळ्यांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे.

ही केवळ सुरुवात आहे.

पुढील भागात शहरातील इतर विभागांचे वास्तव उघड होणार आहे…
Tags: Editorialnagar parishad
TweetSendShareShare
Previous Post

तंबाखू माफियांचा उच्छाद; बंदीला हरताळ, प्रशासनाची मूक संमती!

Next Post

दुःखद : माजी नगरसेवक राजू डफ यांचे अपघाती निधन

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL