• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे तंत्रज्ञानाधारित अध्यापनावर शिक्षक कार्यशाळा

🌐 बदलत्या काळात शिक्षकांनी डिजिटल साक्षर व तंत्रस्नेही बनणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन

Wani Times by Wani Times
December 24, 2025
in वणी, शैक्षणिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 640

वणी टाईम्स न्युज : परंपरागत अध्यापन पद्धती पलीकडे जात आधुनिक तंत्रज्ञान, शैक्षणिक मूल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा समन्वय साधणारी “Technology Led Excellence in Teaching” या विषयावरील एक दिवसीय शिक्षक कार्यशाळा लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाजप्रबोधन, स्वच्छता व शिक्षणाबाबतचे त्यांचे विचार आजच्या आधुनिक शिक्षणव्यवस्थेतही तितकेच उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. शिक्षणात तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संस्कार व सामाजिक जाणीव यांची सांगड घालणे आवश्यक असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. हरिओम पुण्यानी (नागपूर) यांनी “Excellence in Teaching” या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षक हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारे नसून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे शिल्पकार असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यापनात नावीन्य, संवेदनशीलता, सकारात्मक संवाद व आत्मपरीक्षण यांचे महत्त्व स्पष्ट करत, महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ संकल्पनेचा संदर्भ देत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कौशल्याधारित असावे, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळात शिक्षकांनी डिजिटल साक्षर व तंत्रस्नेही बनणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दुसऱ्या सत्रात डॉ. कौशिक जोशी (अमरावती) यांनी “AI and Teaching Excellence” या विषयावर सादरीकरण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल साधनांच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी, रंजक व सहभागात्मक कसे करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर विवेचन त्यांनी केले. तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात सातत्याने सकारात्मक संवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Physiotherapy Treatment

ही संपूर्ण कार्यशाळा शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक पार पडली. प्रभावी वक्ते आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे उपस्थित शिक्षकांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली. या कार्यशाळेत लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयासह मॅकरून स्टुडंट अकॅडमी, ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल, संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, सुशगंगा पब्लिक स्कूल, मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूल व न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे संचालन सौ. पंपा मित्रा यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित अणे यांनी केले. समारोपप्रसंगी मान्यवर वक्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा देणारी ही कार्यशाळा वणीच्या शैक्षणिक वातावरणाला नवा दृष्टिकोन व नवचैतन्य देणारी ठरली.

Tags: lion's schoolseminar
TweetSendShareShare
Previous Post

नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे) गटाचा सुपडा साफ !

Next Post

घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक; ८ घरफोडी उघडकीस

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL