वणी टाईम्स न्युज: वणी तालुक्यात सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या रॉयल फाउंडेशन, वणी या संस्थेला आज 4 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेची सुरुवात थोड्या अडथळ्यांत झाली असली तरी अध्यक्ष ऍड. निलेश म. चौधरी यांचे नेतृत्व, सहकाऱ्यांचे समर्पण आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे आज ही संस्था आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे.

रॉयल फाउंडेशनची भारत सरकारच्या नीती आयोगाकडे नोंदणी झालेली असून संस्थेला युनिक आयडी कोड प्राप्त झाला आहे. यासोबतच संस्थेला आयकर विभागाचे 12-अ व 80-जी प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत, जे समाजसेवेतील कार्यासाठी अधिकृत मान्यता दर्शवतात.
मागील चार वर्षांत संस्थेद्वारे विविध सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेच्या माध्यमातून एम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे, जी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठा आधार ठरली आहे.
या पुढील काळात संस्थेचे सामाजिक कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस असून, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष ऍड. निलेश म. चौधरी यांनी केले आहे.“आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज हा टप्पा गाठता आला आहे. अजून खूप मोठे ध्येय गाठायचे आहे. आपल्या साथीसाठी मनःपूर्वक धन्यवाद.” असे अध्यक्षांनी नम्र शब्दांत भावना व्यक्त केल्या.
संस्था तपशील:
रॉयल फाउंडेशन, वणी
ता. वणी, जि. यवतमाळ
(नोंदणी क्र.: यवतमाळ 0000146/2021)
(एफ क्र. 20999 यवतमाळ)










