Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home वणी

‘त्या’ अवैध रेती घाटावर टाकलेली धाड संशयाच्या भोवऱ्यात

हजारों ब्रास रेतीचा दंड कुणावर ? रेती तस्करावर फौजदारी कारवाई का नाही ? ▪️मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी

May 21, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,827

वणी टाईम्स न्युज : वर्धा नदी पात्रात झोला गावालगत अवैध रेती घाटावर वणी तहसीलदारांनी टाकलेली धाड संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 6 एप्रिल 2025 रोजी रात्री 2 वाजता महसूल कार्यालयातील एका कर्मचाऱ्यासोबत स्वतः तहसीलदार निखिल धुळधर यांनी टाकलेल्या या धाडीत एक पोकलेन मशीन व हायवा ट्रक जप्त करण्यात आले. धाडीच्या ठिकाणी सहकाऱ्यांनी काढलेल्या फोटोमध्ये तहसीलदार यांच्या पासून काही मीटर अंतरावर हायवा जवळ एक रेती तस्कर उभा असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच सदर ठिकाणी अवैधरीत्या हजारों ब्रास रेती उपसा केल्याने नदी पात्रात मोठे मोठे खड्डे तयार झाल्याचे तहसीलदार यांनी स्वतः पाहिले.

सदर धाडी दरम्यान रेती उपसा, वाहतूक व रेती तस्कर मिळून आल्याचे भक्कम पुरावे असताना महसूल अधिकाऱ्यांनी त्या रेती तस्करावर फौजदारी कार्यवाही न करता फक्त दंडात्मक कार्यवाही केली. विशेष म्हणजे नदी पात्रातून करोडो रुपयांची रेती चोरीला गेली असता संबंधित साजाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तहसीलदारांनी टाकलेली धाड पूर्व नियोजित (Pre-planned )असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

नुकतेच सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे व युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे यांनी वर्धा नदी पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीसाठी संबंधित साज्याचे मंडळ अधिकारी व तलाठी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत रवींद्र कांबळे यांच्या पत्राच्या संदर्भाने उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले यांनी 2 मे 2025 रोजी तहसीलदार वणी यांना पत्र देऊन मंडळ अधिकारी जयंती झाडे व तलाठी कुणाल आडे यांच्यावर प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तर युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे यांनी थेट चंद्रकांत बावनकुळे यांना पत्र देऊन तहसीलदार वणी यांनी झोला घाटावर टाकलेल्या धाडीची चौकशी करणे तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Tags: Lead storyrevenue departmentsand smuggling
TweetSendShareShare
Previous Post

दुखद समाचार ; मंगल बाबू चिंडालिया का स्वर्गवास

Next Post

भाकरी फिरवली ; तारेंद्र बोर्डेच्या जागी प्रफुल चव्हाण भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL