वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, पाणी व वीज समस्यांसह विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना एकरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत, पीकविमा रक्कम त्वरित जमा करणे, रांगणा-भुरकी पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, नियमित वीजपुरवठा, स्वच्छ पाणी, घरकुलासाठी रेती उपलब्ध करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनात कांग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, देविदास काळे, प्रशांत गोहकार, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर ओम ठाकूर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, राकेश खुराना, गौरीशंकर खुराना, उत्तमराव गेडाम, सुरेश रायपुरे, तेजराज बोढे, संगीता खाडे, नीलिमा काळे, वंदना आवारी, सविता रासेकर, साधना गोहकार, शारदा ठाकरे, अनंत डंबारे, अशोक चिकटे, रवी कोटावार, अनंत चौधरी, जगदीश चौधरी, राजू अंकितवार, डेव्हिड परकावार, अंकुश मापूर, प्रवीण बद्दमवार यांच्यासह वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते.

“नागरिकांच्या हक्कांसाठी काँग्रेस अखेरपर्यंत लढा देणार. समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संजय खाडे यांनी दिला.










