Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

साहेब.. तुमच्या काळात आम्हाला रस्ते, नाल्या व शुद्ध पाणी मिळाला

🗳️ माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात मतदार संपर्क अभियान

November 25, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 809

वणी टाईम्स न्युज : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचाराची गती अधिक वाढवली आहे. नगराध्यक्ष व भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रभाग मध्ये घरोघरी संपर्क मोहीम राबवत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही या संपर्क मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत, साहेब तुमच्या कार्यकाळात आम्हाला सिमेंट रस्ते, बगीचे, ड्रेनेज व पिण्याचा पाणी मिळालं. आम्ही सदैव तुमच्या सोबत, अशी ग्वाही दिली. बँक कॉलनीतील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रभाग 1 मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

प्रभाग क्रमांक 1 चे भाजपचे उमेदवार उमाकांत उर्फ बालू जोगी आणि मीनाक्षी शैलेश जूनघरे हे आपल्या प्रभागात घराघरातून फिरत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. उमेदवारांनी प्रभागातील विविध वस्तींत जाऊन महिलांशी संवाद, ज्येष्ठांची भेट, युवकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी भाजपच्या कार्यकाळात शहरात रस्ते, नाल्या, सौंदर्यीकरण, पाणी पुरवठ्याचे काम झाल्याबद्दल आभार मानून लक्षणीय बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

भाजपच्या स्थानिक संघटनेने ‘विकासासाठी प्रभाग क्रमांक 1 तयार’या संदेशासह सशक्त संपर्क मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. उमाकांत उर्फ बालू जोगी आणि मीनाक्षी शैलेश जूनघरे यांनी प्रभागातील बँक कॉलनी, रवीनगर, गुलमोहर पार्क, आयटीआय कॉलनी, नांदेपेरा रोड, चट्टे ले आऊट, विद्यानगरी, विठ्ठलवाडी, रेल्वे स्टेशन या भागातील प्रत्येक कुटुंबाशी थेट संवाद साधून आगामी पाच वर्षांसाठी विकासाचा ठोस आराखडा स्पष्ट केला.

सोमवारी प्रचार रॅलीमध्ये संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी, जिल्हा सचिव संतोष डंभारे, जिल्हा युवा मोर्चा सचिव श्रेयस हरणे, प्रभाग प्रभारी हितेन अटारा, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या सचिन आत्राम, मीनाक्षी शैलेश जूनघरे (उमेदवार) उमाकांत( बालू) महादेवराव जोगी (उमेदवार), शैलेश जूनघरे, छायाताई उपलेंचवार, गणपतराव हेपट, प्रवीण क्षीरसागर, राहुल उपलेंचवार, मोनिका जोगी, माया नांदेकर, लता पाटणकर, करुणा मारोडकर, विजया भोयर, कल्पना दाढे, सुनीता सेटिया, सविता धात्रक, सुषमा दुग्गड, बरखा बाजोरिया, विद्या क्षीरसागर, नंदा शेडामे, शोभा हेपट, माही भगत सह शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचा धुवाधार प्रचार सुरू असल्याने विरोधकांमध्येही हालचाल वाढली आहे. पुढील काही दिवसांत प्रचार आणखी गतिमान होणार असून वरिष्ठ नेते प्रभागातील सभांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक मोहल्ल्यात कॉर्नर मिटिंगच्या माध्यमातूनही मतदारांची भेटीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Tags: bjpeye campnagar parishad election
TweetSendShareShare
Previous Post

अल्पवयीन मुलगी बेपत्ता : मैत्रिणीवर अपहरणाचा गुन्हा दाखल

Next Post

चारित्र्यावर संशयावरुन पत्नीसोबत भांडण, मुलीचा हात तोडला

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL