वणी टाईम्स न्युज : शहरातील नांदेपेरा मार्गावर सहारा प्रोव्हीजनचे संचालक विजय कवरासे यांची पत्नी ज्योती कवरासे (45) हिचे हृद्यघाताच्या तीव्र धक्क्याने बुधवारी रात्री 10.30 वाजता दरम्यान दुखद निधन झाले. दुकान सुरू असताना 10 वाजता दरम्यान ज्योती हिला श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यामुळे तिला तात्काळ एका खाजगी हॉस्पिटल येथे नेले. दवाखान्या डॉक्टरांनी ई सी जी काढत असताना तिला हृदयाघातचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला.
विशेष म्हणजे रात्री 9.30 वाजे पर्यंत ज्योती कवरासे ह्या दुकानात ग्राहकांशी चांगल्या बोलत समान देत होत्या. त्यावेळी त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. मात्र पुढील अर्ध्या तासात सर्व खेळ खल्लास झाला. मृतक ज्योती हिच्या मागे सासरे, पती व दोन मुले आहेत.









