Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home निधन

अंतिम सत्य : माजी आमदार विश्वास नांदेकर अनंतात विलीन

🔥 मूळभाव पठारपूर येथे झाले अंत्यसंस्कार 📌 पालकमंत्री संजय राठोडसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी उपस्थित

December 23, 2025
in निधन, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,186

वणी टाईम्स न्युज: वणी विधानसभेचे माजी आमदार दिवंगत विश्वासभाऊ नांदेकर यांचे पार्थिव शरीराचे मंगळवार 23 डिसेंबर रोजी त्यांचे मूळ गाव पठारपूर येथे त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत नांदेकर यांना त्यांच्या पुतण्या विशाल नांदेकर यांनी मुखाग्नी दिली. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता, पठारपूर येथे रहिवासी तसेच हजारोंच्या संख्ये कार्यकर्ता व नांदेकर समर्थक उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा 21 डिसेंबर रोजी रात्री मुंबई येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले होते. मुंबई येथून त्यांचे पार्थिव ॲम्ब्युलन्स मध्ये वणी येथे आणण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी 9.30 वाजता एका सजविलेल्या वाहनात शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह पार्थिव त्यांचे मूळ गाव पठारपूर येथे नेण्यात आले. दरम्यान टिळक चौक, गणेशपूर, पेटुर, कायर या गावातील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून दिवंगत नांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

पठारपूर येथे त्यांचे राहते घरी शेवटच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजुरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर, मनसे नेता राजु उंबरकर, शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया, काँग्रेस नेते संजय खाडे यांनी त्यांच्या पार्थिव देहावर श्रद्धासुमन अर्पित केले.

अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. अंत्यसंस्कार दरम्यान शासकीय प्रतिनिधी म्हणून वणीचे उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धूळधर उपस्थित होते. यावेळी मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची हजेरी लक्षात घेता पोलिस व वाहतूक पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. येणाऱ्या लोकांचे वाहने उभे करण्यासाठी पठारपूर गावालगत एका शेतात पार्किंग स्थळ तयार करण्यात आले होते.

Tags: funeralLead storynidhan vartaVishwas Nandekar
TweetSendShareShare
Previous Post

नही रहे वणी के पुर्व विधायक विश्वास नांदेकर

Next Post

उपाध्यक्ष पदासाठी राकेश बुगेवार यांच्या नावाची चर्चा

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL