वणी टाईम्स न्युज : हल्ली प्रत्येक व्यवसायात प्रतिस्पर्धा पाहायला मिळत आहे. समाजात वाईट समजला जाणारा वेश्या व्यवसायही या प्रतिस्पर्धेपासून सुटलेला नाही. दैहिक सुखासाठी येणाऱ्या ग्राहकाला आपल्याकडे खेचण्यासाठी वारांगना विविध फंडे वापरता असतात. अशातच वणी येथील प्रेमनगर वस्तीत देह व्यवसाय करणाऱ्या दोन वारांगनामध्ये गिऱ्हाईकावरून जोरदार राडा झाला. यात एका व्यक्तीने वारांगनाच्या डोक्यावर खुर्चीने हल्ला करुन जखमी केले.
फिर्यादी महिला (35) हिने वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती प्रेमनगर वस्तीत देह व्यवसाय करुन उपजीविका चालवते. तिच्या घराशेजारी महिला देखील देह व्यवसायात गुंतलेली असून, दोघींमध्ये गिर्हाईकांवरून सतत वाद होत असत. दिनांक 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास, फिर्यादी महिला आपल्या घरी असताना शेजारील महिला तिच्या घरासमोर आली आणि “माझ्या कस्टमरला तुझ्याकडे का बोलावतेस?” असा जाब विचारून शिवीगाळ करू लागली. त्याचवेळी तिच्यासोबत असलेला एक अज्ञात इसमाने घराजवळ ठेवलेल्या खुर्चीने फिर्यादीचे डोक्यावर व डाव्या हातावर जोरदार मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांनी पीडितेला जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.
या प्रकारामुळे पीडितेच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, तिने वणी पोलिस ठाण्यात येऊन आपल्या जखमा दाखवत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपीं महिला पिंकी व एक अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 118(1), 351(2), 351 (3), 352 विरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.










