वणी टाईम्स न्युज : अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांनी चिखलगाव येथे पकडला. दिनांक 28 मे रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत महसूल पथकाने ट्रॅक्टर क्रमांक MH29 AD 9851 व 1 ब्रास रेती भरलेली ट्रॉली जप्त केली. सदर प्रकरणी रेती वाहतूकदार मनोज सुरेश मिलमिले रा. चिखलगाव विरुद्ध महसूल व पर्यावरण कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेशपुर साजाचे मंडळ अधिकारी यू. व्ही. डवरे यांना चिखलगाव येथे अवैधरीत्या रेती वाहतुकीची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी बुधवार दुपारी 2.20 वाजता गणेशपुर येथे सापळा लाऊन ट्रॅक्टर पकडला. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉली एस. टी. डेपो परिसरात ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार चिखलगाव येथे अनेक दिवसांपासून रेतीची तस्करी सुरु होती. परंतु महसूल विभागाला कारवाईसाठी मुहूर्त सापडला नव्हता की काय.! असा प्रश्न निर्माण झाला आहे.










