Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

रात्रीस खेळ चाले: रेती घाटावर मध्यरात्री धाड, 3 हायवा जप्त

अहेरी बोरगाव रेती घाटावर मध्यरात्री महसुल पथकाची धाड

May 24, 2024
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,678

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील सर्व रेती घाट बंद असताना काही घाटावरून मध्यरात्री रेती तस्करीचा खेळ सुरु असल्याचे शुक्रवारी उघड झाले. घाटावरून अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहितीवरुन महसूल पथकाने गुरुवारी मध्यरात्री अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून 3 हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने धाड टाकताच दोन ट्रक चालकांनी ट्रकमध्ये भरलेली रेती तिथेच खाली केले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी रेती भरलेला एक व दोन रिकामे ट्रक जप्त केले.

तालुक्यात रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथक स्थापन केलेले आहे. गुरुवारी नाईट पेट्रोलिंग करताना महसूल पथकाला अहेरी (बोरगाव) रेती घाटावर अवैधरीत्या रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाली. रेती उपसा बाबत मंडल अधिकारी देशपांडे यांनी तात्काळ नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना सूचना दिली. सूचनेवरून नायब तहसीलदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्री 1.30 वाजता अहेरी (बोरगाव) रेती घाटावर छापा टाकला.

महसूल अधिकाऱ्यांनी रेती घाटावर रेती भरलेला हायवा ट्रक क्रमांक MH40-BG 0198 मध्ये तब्बल 9 ब्रास रेती भरलेली आढळली. तर MH 40-CT 3742 आणि MH34 – BG 9064 क्रमांकाच्या ट्रक चालकांनी छापा पडताच ट्रक मध्ये भरलेली रेती जागेवरच खाली केली.

महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तिन्ही ट्रक तहसील कार्यालय परिसरात लावले. सदर कार्यवाही उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी पाचभाई, मोहितकर, इंगोले, गोहने यांनी केली.

Tags: collector yavatmalLead stroyraidsand smugglingsdo waniwani taluka
TweetSendShareShare
Previous Post

देव तारी त्याला कोण मारी ..! झामड कुटुंबीयांना आला म्हणीचा प्रत्यय 

Next Post

प्रतिबंधित कापूस बियाणांची विक्री, अल्पवयीन सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL