वणी टाईम्स न्युज : रात्रीच्या काळोखात अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक हायवा ट्रक वणी पोलिसांनी पकडला. नांदेपेरा मार्ग डिपी रोडवजवळ पोलिसांनी ही कारवाई शुक्रवार रात्री 11 वाजता दरम्यान केली. ट्रक चालकाकडे रेती वाहतुकी संबंधी कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याने पोलिसाने सदर ट्रक पोलीस ठाण्यात नेले आहे. रेती तस्करी करणाऱ्या ट्रक सोबत एका कारमध्ये रेती तस्करी करणारा पटेलही सोबत होता. आता पोलीस रेती तस्करावर कारवाई करणार की सोडणार ! हे शनिवारी स्पष्ट होईल.
खनिज वाहतूक कायद्यानुसार सायंकाळी 6 वाजता नंतर रेतीची वाहतूक करता येत नाही. (रॉयल्टी असली तरीही) पोलिसांनी ही बाब लक्षात घ्यावी.
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.










