• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी नगर परिषदेला नवे नेतृत्व; विकासाचा नवा अध्याय सुरू

Wani Times by Wani Times
January 25, 2026
in ब्रेकिंग न्युज, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,131

वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या खेमराज ऊर्फ सचिन आत्राम तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथग्रहण व सत्कार सोहळा सोमवारी दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता नगर परिषद प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राकेश बुगेवार यांना उपाध्यक्ष पदावर आसिन करताना

सत्कार सोहळ्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या सभेत भाजप गटनेते व नगरसेवक राकेश बुगेवार यांची सर्वसंमतीने नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच किशन खुंगर व रवी बेलुरकर यांना स्वीकृत सदस्य नगर परिषदेत मान्यता देण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व 18 नगरसेवक तसेच अपक्ष नगरसेवक राजू भोंगळे उपस्थित होते.

स्वीकृत नगरसेवक किशन खुंगर यांना शुभेच्छा देताना संजीवरेड्डी बोदकुरवार

विशेष बाब म्हणजे वणी नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच आदिवासी समाजातील महिलेला नगराध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. शपथग्रहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. नागरिकांचे आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण व्यवस्था व स्वच्छता या मूलभूत बाबींवर नगर परिषद विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणाचा नवा अध्याय सुरू करताना कुटुंबासह नगराध्यक्ष विद्या आत्राम

या शपथग्रहण सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजप शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, नगराध्यक्ष विद्या सचिन आत्राम, ललिता बोदकुरवार यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी गव्हाणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन ॲड. निलेश चौधरी यांनी केले.

उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, अखेर सामंजस्याचा तोडगा

नगरपालिका उपाध्यक्षपदासाठी यावेळी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. या पदासाठी दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक राकेश बुगेवार तसेच कुणबी समाजाचे लक्ष्मण उरकुडे इच्छुक होते. कार्यक्रमापूर्वी स्थानिक विश्रामगृहात मंत्री प्रा. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व भाजप पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत उपाध्यक्षपदाचे पहिले अडीच वर्ष राकेश बुगेवार व उर्वरित अडीच वर्ष लक्ष्मण उरकुडे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्व नेतेमंडळी कार्यक्रमस्थळी उपस्थित झाली.

Tags: bjp waninagarpalika wanipolitical
TweetSendShareShare
Previous Post

‘स्वीकृत’ सदस्यों को लेकर वणी शहर बीजेपी में घमासान

Next Post

शिवसेना वणी शहर संपर्क प्रमुख राजू तुराणकर यांचा राजीनामा

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL