वणी टाईम्स न्युज : वणी वरोरा मार्गावर नायगाव (खुर्द) जवळ अज्ञात वाहनाने एका 18 वर्षीय तरुणाला चिरडले. मंगळवार 1 एप्रिल रोजी 11.30 वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात मयूर बंडू सोनटक्के रा. नायगाव खुर्द या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतक मयूर यांनी नुकतीच 10 वी ची परीक्षा दिली होती. मयूर हा रात्री महामार्गावर कशासाठी गेला ? याबाबत काही कळू शकले नाही. मयूरचा मृतदेह वणी येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले असून नातेवाईक रुग्णालयात जमा झाले आहे. मृतक याच्यामागे आईवडील व एक मोठा भाऊ असल्याची माहिती आहे.










