वणी टाईम्स न्युज : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार स्व. सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खा. प्रतिभा धानोरकर यांच्या सौजन्याने वणी येथे कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते 4 एप्रिल रोजी येथील शासकीय मैदानावर या खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 4,5, व 6 एप्रिल रोजी गादी वर होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, येथील कबड्डी संघ सहभागी होणार आहे.

स्पर्धेत प्रथम विजयी संघाला 1 लाख, द्वितीय विजयी संघाला 71 हजार, तृतीय विजयी संघाला 51 हजार तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवा नवरंग क्रीडा मंडळाचे सचिन टेकाम, आशिष धोंगडे, संदीप फटाले, विशाल नैताम यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









