वणी टाईम्स न्युज : वणी कायर मुकुटबन मार्गावर चिखलगाव टी पॉईंट ते घोंसा फाटा पर्यंत रmmस्त्याची दुरावस्था बाबत शिवसेना युवासेनेचे निवेदनाची दखल घेत तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले आहे. या मार्गावरील धोकादायक खड्ड्यांबाबत युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले होते. सदर निवेदनात रस्त्याची गंभीर अवस्था, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला होता.
मात्र राज्य महामार्ग क्रमांक 319 चा भाग असलेला सदर मार्ग हायब्रीड अम्युनिटी प्रकल्प (HAM) अंतर्गत मंजूर असून सा.बा. विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (MSIDC) यांचेकडे सुपूर्द असल्याचे बांधकाम विभागाने कळविले. त्यानंतर युवासेना उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी MSIDC अधिकाऱ्यांची संपर्क साधून खड्डे बुजविण्याची मागणी केली.
युवासेनेचे निवेदनाची MSIDC प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, संबंधित ठिकाणी तात्पुरता स्वरूपात मुरूम गिट्टी भरून खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे या मार्गावर वाहन चालकाना दिलासा मिळाला आहे.










