Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

टास्क फ्रॉड – छोरीया ले ऑउट येथील युवकाला साडे पाच लाखाने गंडविले

झटपट पैसे कमविण्याची हाव पडली महागात ... अनोळखी आरोपीविरुद्द वणी पोलिसात गुन्हा दाखल

November 23, 2023
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 662

वणी : झटपट पैसे कमविण्याची हाव एका युवकाला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखुवून अज्ञात आरोपीने युवकाला लाखोंचा गंडा घातला. छोरीया लेऑउट गणेशपूर येथे 9 नोव्हें. ते. 13 नोव्हे. दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने ज्यादा परतावा आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली. पिडीत युवकाने यवतमाळ सायबर पोलिसांकडे तसेच वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादनुसार टेलीग्राम ॲपवर लिंक पाठविणारे तसेच अज्ञात बँक खातेधारक विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार भगवानदास सोनपाल सिंग (34) रा. कल्याणपुर पिनाहट, पो. कुक्तरी, जि. आगरा , उ.प्र.  ह.मु. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, छोरीया ले ऑउट वणी हे खाजगी नोकरी करतात.  दिनांक 9 नोव्हे. रोजी तक्रारदार यांच्या टेलिग्राम अप्सवर अज्ञात व्यक्तीने लिंक पाठवून टास्क पूर्ण केल्यास दुप्पट पैसे मिळणार, असा मेसेज पाठविला. तक्रारदार यांनी लिंक ओपन करून संबंधित खात्यात 23 हजार 28 रुपये ट्रान्सफर केले. थोड्याच वेळात त्याच्या खात्यात 45 हजार 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला.

दुप्पट रकम जमा झाल्यामुळे भगवानदास यांचा सदर व्यक्तीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी 11 नोव्हे. ते 13 नोव्हे. चा कालावधीत आरोपीने दिलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यात 5 लाख 40 हजार 804  आपल्या बँक खात्यातून ट्रान्सफर केले. मात्र त्यांच्या बँक अकाउंट मध्ये एकही रुपया परत जमा झाला नाही. ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे लक्षात येताच भगवानदास यांनी सायबर सेल कडे तक्रार केली. सायबर सेल कडून त्यांना 17 नोव्हे. रोजी त्यांचेकडून पाठविण्यात आलेले रकमेपैकी 1 लाख 52 हजार 598 रुपये होल्ड करण्यात आल्याचा संदेश आला. तक्रारदार भगवानदास सोनपाल सिंग यांनी 22 नोव्हे. रोजी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्द ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्द कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags: Lead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

पिक विम्याचा मुद्द्यावर मनसेचा विमा कंपनी कार्यालयात राडा

Next Post

नागपूर व वणी येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL