वणी टाईम्स न्युज | तान्हा पोळा उत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, वणी शहराच्या वतीने आकर्षक तान्हा पोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कल्याण मंडपम, आंबेडकर चौक, वणी येथे पार पडणार आहे.

नंदी बैल सजावट स्पर्धेची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
‘अ’ गट : 01 ते 05 वर्ष वयोगट
प्रथम बक्षीस – ₹ 5,000
द्वितीय बक्षीस – ₹ 3,000
तृतीय बक्षीस – ₹ 2,000
‘ब’ गट : 05 ते 12 वर्ष वयोगट.
प्रथम बक्षीस – ₹ 5,000
द्वितीय बक्षीस – ₹ 3,000
तृतीय बक्षीस – ₹ 2,000
या व्यतिरिक्त प्रत्येक गटातील तीन स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे तसेच प्रत्येक सहभागीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्णतः निःशुल्क ठेवण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी मुख्य संयोजक रवी बेलूरकर, वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, स्पर्धा संयोजक आशिष डंभारे, सहसंयोजक विलास डवरे, नितीन बिहारी व राजेंद्र जयस्वाल यांनी पालक व लहानग्यांना आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन तान्हा पोळ्याचा आनंद लुटावा व बक्षिसे मिळवावी.










