वणी टाईम्स न्युज : येथील श्री रामदेव बाबा अपंग मूकबधिर कर्मशाळेच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी झालेल्या बारावी (HSC) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या परीक्षेत महादेव भोयर, समीर आत्राम आणि विशाल गायकवाड या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे संस्थेचा तसेच पालकांचा अभिमान उंचावला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दलित मित्र मेघराजजी भंडारी व सचिव डॉ. जिनेंद्र भंडारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरोज जैन यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशामागील मेहनत आणि चिकाटीचे विशेष उल्लेख केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या यशामध्ये शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा असून, चित्रलेखा लारोकर, भारती हिवरे, प्रतिभा मोहुर्ले, प्रिया मिलमीले, कोमल एरखाडे आणि अमोल गोहोकर यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.










