वणी टाईम्स न्युज: झरीजामणी तालुक्यातील अडेगाव येथील जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंटमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आत्मीयता निर्माण करणे, परंपरांची जाणीव करून देणे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक संदीप आसुटकार होते. प्रमुख अतिथी म्हणून संगीता संजय खाडे उपस्थित होत्या, तर उद्घाटन अडेगावच्या सरपंच गंगा काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कविता चटकी, नितेश ठाकरे, माजी सरपंच अरुण हिवरकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देव येवले यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नम्रता आसूटकर, नीलिमा ठाकरे आणि बेबी ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सूत्रसंचालन वनिता खोबरे आणि दीक्षा झाडे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन नम्रता आसुटकर यांनी व्यक्त केले. एकूणच, जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट, अडेगाव येथील हा सांस्कृतिक सोहळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि संस्कारमूल्ये दृढ करणारा ठरला.










