वणी टाईम्स न्युज: नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 29 नोव्हेंबर रोजी वणीमध्ये भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत. नगर परिषदेच्या 29 नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, शहरात निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजताव शहरातून निघणारी भव्य रॅली ही प्रमुख आकर्षण ठरणार आहे. रॅलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवा आणि विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी होतील. उमेदवारांच्या कार्याचा आढावा, विकास आराखडा आणि पक्षाची भूमिका रॅलीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे.

रॅलीनंतर दुपारी शासकीय मैदान पाच्याची टाकीजवळ वणी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेत आगामी पंचवार्षिक काळातील वणी शहराचा विकास मार्ग, नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि भाजपचे धोरण यावर प्रकाश टाकला जाणार आहे.

भाजप नेत्यांनी वणीतील सर्व नागरिकांना 29 नोव्हेंबर रोजी नियोजित रॅली आणि जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवा आणि वणीच्या विकासयात्रेत हातभार लावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.










