जितेंद्र कोठारी, वणी : वणी नगर परिषद निवडणुकीला अवघे अकरा दिवस शिल्लक राहिले आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. शुक्रवारी नामनिर्देशन पत्र परत घेण्याचे शेवटचे दिवस असून बागी आणि अपक्ष उमेदवारांची मनधरणी सुरु आहे. मात्र पक्षाचे अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही खाजगीरित्या आपले प्रचार सुरु केले आहे.
उमेदवार सकाळपासून हितचिंतकासह आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन काका, काकू, आजी, आबा… फक्त आमच्या चिन्हा समोरील बटण दाबा, अशी विनवणी करताना दिसताहेत. आणि मतदारही कोणाला नाराज न करता “आमचा मत तुम्हालाच” असा आश्वासन दारी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला देत आहे. निवडणूक विभागाकडून 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. त्यानंतरच उघड प्रचार करता येणार आहे.
🔮सोशल मीडियावर प्रचाराला वेग
बदलत्या युगासोबत निवडणूक प्रचाराचा रूप बदलला आहे. हल्ली व्हॉट्सॲप स्टेट्स, फेसबुक, इंस्टाग्राम, वेबपोर्टल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रचाराला वेग आलं असून सोशल मिडिया पोस्ट तयार करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. एसएमएस व व्हॉईस कॉलिंगच्या माध्यमातून वोट मागण्याची पद्धत स्थानिक निवडणुकीत वापरली जात आहे.
👎न केलेल्या कामाचा श्रेय घेण्याचाही डाव
वणी नगर परिषदेच्या मागील कार्यकाळात शहरात अनेक ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. वास्तविक पाहता तात्कालीन आमदार व नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाने शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र ज्या नगरसेवकांना यावेळी उमेदवारी पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष उमेदवार म्हणून ” बगीचा मी बनवला, रस्ते मी बनवले, नाली मी बनवली. असे सांगत कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.










