वणी टाईम्स न्युज: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्तन कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर (सर्व्हिकल कॅन्सर) आणि अंडाशयाचा कॅन्सर हे आजार महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये विशेषत: ग्रामीण व लहान शहरांतील महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव व नियमित तपासणी न होण्यामुळे वाढते मृत्यूदर चिंताजनक आहे. हीच चिंता लक्षात घेऊन वणी येथे रविवार, दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी निःशुल्क स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स क्लब वणी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, नॉर्थ नागपूर चॅप्टर मेनोपाज सोसायटी नागपूर आणि असोसिएशन ऑफ सर्जन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिरात नागपूर येथील तज्ञ महिला डॉक्टरांच्या चमु द्वारा महिलांशी संबंधित आजारांची निःशुल्क तपासणी व निदान करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात मुख्यतः स्तन कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, थायरॉईड कॅन्सर इत्यादी आजारांचे तपासणी करून निदान व औषधे दिली जाणार आहे.
शिबिरात डॉ. निर्मला वझे, डॉ. विद्या सुतवणे, डॉ पारुल सावजी, डॉ नेहा मल्लवार, डॉ प्राची उईके, डॉ. नूतन आंबेकर, डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. नीलम पुनियानी, डॉ. उज्ज्वला देशमुख, डॉ. भावना पांडा रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणी साठी रुग्णांची नोंदणी सकाळी 8:00 वाजता पासून शिबिर स्थळी सुरू होणार. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता पर्यंत रुग्णांची तपासणी होणार आहे.

वणी शहर व ग्रामीण भागातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, सचिव लायन प्रा. डॉ. अभिजित अणे, प्रकल्प निर्देशक लायन मंजिरी दामले व लायन्स क्लबच्या सदस्यांनी केले आहे.
नोंदणी आणि अधिक माहिती साठी मोबाईल क्रमांक 9049851616 व 7378576008 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे










