जितेंद्र कोठारी, वणी: उपविभागातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली असून, वणी येथील सुप्रसिद्ध ‘लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ हे शासकीय आरोग्य योजनांचा लाभ देणारे वणी उपविभागातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठरले आहे. केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याअंतर्गत येथे पात्र रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.

आतापर्यंत या योजनांचा लाभ घेण्यासाठी वणी व परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना नागपूर, चंद्रपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र आता नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेसह आधुनिक वैद्यकीय सुविधा वणीमध्येच उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि त्रास वाचणार आहे. या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन लोढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध
लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वणी येथे रुग्णांसाठी सर्वांगीण उपचार सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये जनरल मेडिसिन (हृदयविकार, विषबाधा, सर्पदंश), हृदयरोग, फुफ्फुस विकार, मेंदू विकार, डायलिसिस, संसर्गजन्य रोग, संधिवात, अतिदक्षता विभाग (ICU), नवजात शिशु व बालरोग उपचार, मुतखडा व मूत्ररोग शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, हाडांचे विकार व अपघातजन्य शस्त्रक्रिया तसेच सामान्य शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची ओपीडी
नागपूर व चंद्रपूर येथील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची नियमित ओपीडीही येथे उपलब्ध राहणार आहे. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघणे हे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत तपासणी करतील. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अभिनव पूप्पलवार हे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत सेवा देतील. मुतखडा व मूत्ररोग सर्जन डॉ. अनिकेत देशमुख हे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी, तर वंधत्व व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शरद इंगळे हे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत रुग्णसेवा देतील.
ग्रामीण भागात लवकरच मोफत आरोग्य कॅम्प
लोढा हॉस्पिटलतर्फे लवकरच वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये रुग्ण तपासणी, आयुष्मान कार्ड वितरण तसेच शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली. गोरगरीब रुग्णांनी या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
संपर्क व माहिती-
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार व कार्ड तयार करण्यासाठी रुग्णांनी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ७७४३९१६५८८ या क्रमांकावर संपर्क करता येईल. तसेच शेतकरी मंदिर रोड, बस स्टँड समोर, वणी येथे प्रत्यक्ष भेट देऊनही माहिती घेता येणार आहे.
वणी उपविभागातील रुग्णांसाठी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने वरदान ठरत असून, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे वणी परिसरातील आरोग्यसेवेची पातळी निश्चितच उंचावणार आहे.










