जितेंद्र कोठारी, वणी : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. नुकतेच विनायक नगर येथे वास्तव्यास आणि वरोरा तहसील कार्यालयात कर्तव्यावर असलेले अर्पण नत्थुजी राऊत यांची घराबाहेर ठेवलेली बजाज पल्सर मो. सा. क्रमांक MH34-BX5982 मोटरसायकल किंमत 40 हजार अज्ञात चोरट्याने लंपास केली.
फिर्यादी नत्थु हरबाजी राऊत रा. विनायक नगर वणी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा अर्पण राऊत वरोरा तहसील कार्यालयात नोकरीवर असून तो नेहमी मोटरसायकलने ये जा करतो. दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी अर्पण यांनी वरोरा येथून परत आल्यावर त्याची दुचाकी नेहमी प्रमाणे घरासमोर उभी केली. दुसऱ्यदिवशी सकाळी त्याची दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी आढळली नाही. त्यामुळे त्यांचे वडील नत्थुजी राऊत यांनी वणी ठाण्यात कुणीतरी चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची तक्रार नोंदविली.