वणी टाइम्स न्यूज : येथील रंगनाथ स्वामी चौक (दीपक चौपाटी) परिसरातील जत्रा मैदानात बेकायदेशीररित्या जुगार खेळत असलेल्या दोन इसमांवर वणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून, एकूण 4760/- रुपयांचा जुगार साहित्य व रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडण्यात आलेले आरोपींची नावे गुलाब बापुराव उपरे (40 ), रा. लाठी, ता. वणी व प्रवीण सुर्यभान गेडाम (36), रा. पुरड, ता. वणी असे आहे.
ही कारवाई दि. 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलीस नाईक राजकुमार राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर वणी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान काही इतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.










