वणी टाईम्स न्युज: चोरी करण्याच्या उद्देशाने एका बंद दुकानाजवळ अंधारात लपून बसलेल्या एका युवकाला स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने ताब्यात घेतलं. चौकशीत सदर युवक रेकॉर्डवरील गुन्हेगार व अट्टल घरफोड्या असल्याचे आढळले. अनिल ऊर्फ कुंभकर्ण येल्लाजी लोणारे (30), रा. यात्रा मार्ग, पंकज टॉकीजच्या मागे, वडार मोहल्ला, वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे अटकेतील चोरट्यांचे नाव आहे.
दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री गस्त दरम्यान LCB पथकाने शहरातील दीपक चौपाटी परिसरात ही कारवाई केली. ताब्यातील आरोपी हा चोरीसारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसला होता. फिर्यादी हेडकॉन्स्टेबल सुधीर पांडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था. गुन्हा शाखा) यांचे मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर, हेडकॉन्स्टेबल सुनील खंडागळे, हेडकॉन्स्टेबल सुधीर पांडे, PC रजनीकांत मडावी, सलमान शेख, DNPC सतीश फुके सर्व स्था. गुन्हा शाखा पथक यांनी पार पाडली.










