• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

खळबळ : वणीतील तंबाखू तस्करी प्रकरण एसपीच्या दालनात 

युवासेनेचा थेट पोलिसांवर संशय; दोषी तपास अधिकाऱ्याचा निलंबनाची मागणी

Wani Times by Wani Times
January 8, 2026
in क्राईम, यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,174

वणी टाईम्स न्युज : शहरातील पंचशील नगर येथे ८ डिसेंबर २०२५ रोजी पकडण्यात आलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणात आता गंभीर व खळबळजनक वळण लागले आहे. या प्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी थेट वणी पोलीस प्रशासनावर तंबाखू माफियांशी संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, जागरूक नागरिकांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पंचशील नगर येथे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची खेप जप्त केली होती. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले असतानाही, प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन (MH-24-BL-7051) आजतागायत जप्त करण्यात आलेले नाही, ही बाब संशयास्पद असल्याचे शेंडे यांनी म्हटले आहे.

सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष साक्षीदार तसेच वाहन चालक व मालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध असतानाही एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून वाहनावर कारवाई न होणे म्हणजे आरोपींना वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासातील हा ‘अर्थपूर्ण विलंब’ तस्करीमागील आर्थिक साखळी आणि मुख्य सूत्रधार उघडकीस येण्यास अडथळा ठरत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

युवासेनेने या प्रकरणात तीन ठोस मागण्या केल्या आहेत. संबंधित वाहन तात्काळ जप्त करून त्याच्या मालक व चालकावर कठोर कारवाई करावी, FDA ने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरित अटक करावी, तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे.

दरम्यान, येत्या ४८ तासांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, या प्रकरणाकडे स्वतः लक्ष घालून जनतेचा पोलिसांवरील विश्वास अबाधित ठेवावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. या निवेदनामुळे वणी शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तंबाखू तस्कर मकसूदला राजकीय संरक्षण ?

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील मकसूद नामक व्यक्ती हा वणी तालुक्यात गुटखा, तंबाखू तस्करीचा मुख्य सूत्रधार आहे. पंचशील नगर येथे पकडण्यात आलेला अवैध तंबाखूचा मालकही मकसूद असल्याची चर्चा आहे. मात्र त्याने स्थानिक नातेवाईक व एका राजकीय पक्षाचे नेत्याच्या मध्यस्थीने त्याच रात्री प्रकरण हॅण्डल केल्याची खमंग चर्चा शहरात पसरली. त्यामुळे घटनेच्या एका महिन्यानंतरही तंबाखू तस्करीची तपास थंड बस्त्यात असल्याचे बोलले जाते.

Tags: Lead storySP Yavatmaltobacco smugglingwani policeyuvasena
TweetSendShareShare
Previous Post

खंडहर हवेली के खुफिया राज खोलती ‘राजा साहब’

Next Post

आणि ‘ती’ विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी परतलीच नाही

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL