वणी टाईम्स न्युज : हल्ली प्रत्येकाची सहनशक्ती कमी होत असल्याने आपसी वाद वाढत चालले आहे. क्षुलक कारणावरून दोन भावाच्या कुटुंबात वाद व मारहाण होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. परस्पर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वणी येथील दोन कुटुंबातील 7 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहे.
फिर्यादी सपना देवनारायण जोशी, रा. संकटमोचन हनुमान मंदिर, नगर परिषद जवळ वणी हिने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराला लागून तिचे भासरे महेश रामगोपाल जोशी यांचे घर आहे. वर्ष 2004 पासून दोन्ही कुटुंबात हिस्से वाटणीचा वाद सुरु आहे. दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी गैरअर्जदार राहुल महेश जोशी, रुपेश महेश जोशी तसेच दोन महिलांनी फिर्यादी, तिचे पती व मुलगी सोबत अश्लील शिवीगाळ, वाद करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी महेश जोशी, रुपेश जोशी व 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या कुटुंबातील फिर्यादी पूजा राहुल जोशी, रा. संकटमोचन हनुमान मंदिर, नगर परिषद जवळ वणी हिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, मंदिराच्या दरवाजाच्या कारणावरून तसेच जागेच्या वादातून गैरअर्जदार देवनारायण रामगोपाल जोशी (50), त्याची पत्नी व मुलीने तिला अश्लील शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसाने देवनारायण रामगोपाल जोशी, त्याची पत्नी व मुलीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
RCCPL के दो कामगारों के खिलाफ फौजदारी व न्यायालयीन अवमानना का मामला दर्ज










