जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांची निवड झाल्यानंतर विषय समित्याचे सभापती पद कोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र शुक्रवारी नगर परिषदेच्या सर्व सहाही समित्यांचे सभापती, उपसभापती व स्थायी समितीचे सदस्य जाहीर करण्यात आले. उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षेत नगर परिषद सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, नगराध्यक्ष विद्या आत्राम व गटनेता व उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांचेसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नगर परिषद विषय समित्याचे सभापती खालील प्रमाणे
लवलेश लाल : सार्वजनिक बांधकाम समिती
लक्ष्मण उरकुडे : नियोजन आणि विकास समिती
अनिल चिंडालिया: स्वच्छता व सार्व.आरोग्य समिती
सोनाली प्रशांत निमकर: शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती
रीता महेश पहापळे: महिला व बालकल्याण समिती
राकेश बुगेवार : पाणी पुरवठा समिती (पदसिद्ध)
मनिषा गव्हाणे : (उपसभापती) महिला व बालकल्याण समिती

स्थायी समिती :
विद्या खेमराज आत्राम : अध्यक्ष
लवलेश लाल, लक्ष्मण उरकुडे, राकेश बुगेवार, अनिल चिंडालिया, सोनाली निमकर, रीता पहापळे, आरती वांढरे व राजू भोंगळे (सदस्य)

सदर समित्यांचे सभापतीचे व उपसभापतीचे कार्यकाळ पुढील एका वर्षांकरिता असून त्यानंतर उर्वरित नगरसेवकांना सभापती पदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सभापती व उप सभापती पदावर नियुक्त सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन ..💐










